आ. नितेश राणेंच्या उपस्थितीतील बापार्डे गावातील शिवसैनिकांचा तो पक्षप्रवेश फसवा

संतोष नाईकधुरेंसह सर्व सहकारी भाजपाचेच कार्यकर्ते

स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश दाखवून आमदारांना खुश करण्याचा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, बापार्डे सरपंच संजय लाड यांचा हास्यास्पद प्रयत्न

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील बापार्डे गावातील माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात दाखविण्यात आलेला तो पक्षप्रवेश फसवा असून भाजपाचेच कार्यकर्ते असलेल्या नाईकधुरे आदींचा पक्षप्रवेश दाखवून आमदारांकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हास्यास्पद प्रकार भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर आणि बापार्डे सरपंच संजय लाड यांनी केल्याची टीका शिवसेना उबाठा चे तालुकाप्रमुख जयेश अशोक नर आणि युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांनी केली आहे.तसेच हरी वेदृक, लक्ष्मण नरसाळे, रामचंद्र अनभणे, भिकाजी मुळम, नामदेव घाडी, अनिल वेदृक, रामचंद्र वेदृक, गणेश वेदृक, वसंत बाईत आदींनी भाजपात पक्षप्रवेश केल्याचे भासवले होते. मात्र तो पक्षप्रवेश फसवा असून ते सर्व शिवसैनिक ठाकरे शिवसेनेसोबत असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख जयेश अशोक नर म्हणाले. यावेळी युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी, विभागप्रमुख विष्णू घाडी, विभागप्रमुख दिनेश नारकर, उपविभागप्रमुख प्रकाश भेकरे,शाखाप्रमुख बाळकृष्ण नरसाळे, उपशाखाप्रमुख प्रदीप येजरकर, युवासेना शाखाप्रमुख आंनद घाडी, युवा अधिकारी प्रदीप घाडी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!