खारेपाटण हायस्कूलच्या वतीने स्वच्छ्ता मोहीम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टरेट यांनी जाहीर केल्याप्रमाणे दि.१५ सप्टेंबर २०२४ ते २ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा जाहीर करण्यात आला होता. या अनुषंगाने येथील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणच्या शालेय विद्यार्थ्यांनी खारेपाटण येथे स्वच्छ्ता मोहीम राबविली.

खारेपाटण येथील प्रसिद्ध  ७२ खेड्याचे प्रसिद्ध देवस्थान असलेल्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या श्री देव कालभैरव मंदिर परिसराची साफ सफाई करून स्वच्छ्ता मोहिम राबविली.या स्वच्छ्ता पंधरवडा कार्यक्रमात खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह एनसीसी कॅडेट्स व शिक्षकांनी सहभाग घेतला. 

त्याचप्रमाणे या स्वच्छ्ता मोहिमेअंतर्गत ‘चला स्वच्छता करू पर्यटन स्थळांची,हीच वेळ आहे देशाभिमान दाखवण्याची’ या मथळ्याखाली परिसरातील नागरिकांची पोस्टरवर सही घेऊन त्यांना या स्वाक्षरी मोहिमेमध्ये देखील सामील करून घेण्यात आले. यावेळी देव कालभैरव – दुर्गा देवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर गुरव, खारेपाटण हायस्कूलचे  पर्यवेक्षक संतोष राऊत,ज्येष्ठ शिक्षक सुनील जाधव,महादेव मोटे,किरसिंग पाडवी,गोपाळ ठाकूर आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!