आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

” त्या ” वादग्रस्त पुलाचे काम पुन्हा सुरू

कुडाळ (प्रतिनिधी): निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप झालेला कुडाळ येथील वेताळ बांबर्डे- मुस्लिमवाडी आणि महामार्ग जोडणाऱ्या पुलाचे काम आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या पुलाची पाहणी केली. तसेच…

शिक्षक पतपेढी नूतन अध्यक्ष पदी नारायण नाईक व उपाध्यक्ष पदी संतोष राणे

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी नूतन अध्यक्ष पदी नारायण नाईक व नूतन उपाध्यक्ष पदी संतोष राणे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल प्रमुखराजन कोरगावकर, पॅनेलमधील सर्व घटक संघटना पदाधिकारी, आजी माजी संचालक उपस्थित होते.

सहायक संचालकपदी निवड झालेल्या तृप्ती टेमकरचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार..!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सहाय्यक संचालक वित्त व लेखा वर्ग-1 पदी निवड झालेल्या तृप्ती कृष्णा टेमकर हिचा जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देवून सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात हवालदार पदावर काम करणारे कृष्णा टेमकर यांची ती कन्या आहे.…

कोल्हापूर प्रेस क्लब आणि सेवा रुग्णालयाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर प्रेस क्लब आणि सेवा रुग्णालयाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिरात ८० हुन अधिक पत्रकार आणि कुटुंबियांनी लाभ घेतला.आरोग्य उपसंचालक प्रेमचंद कांबळे,प्र.आरोग्य उपसंचालक उज्वला माने,प्रभारी शल्यचिकित्सक डाॅ.संगीता थोरात यांच्यासह कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक…

हळदी कार्यक्रमावेळी पाण्याच्या शॉवरमधून विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : करवीर तालुक्यात एक दुर्दैवी घटना. नातेवाईकाच्या लग्नासाठी सासरवाडीत गेलेल्या तरुणाचा हळदी कार्यक्रमावेळी पाण्याच्या शॉवरमधून विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. ज्योतिबा विठ्ठल कांबळे असं मृत युवकाचं नाव असून तो कोल्हापूरातील एका वृत्तसंस्थेत नोकरीला होता. सर्वांशी नेहमी…

ग्रामसेवक पतसंस्थेच्या निवडणुकिच्या 13 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या १३ जागांसाठी १७ अर्ज प्राप्त झाले होते. यातील एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे १३ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. १३…

महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मालवण मध्ये होणार चिंतन शिबीर!

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपुर्ण ठसा उमटविणार्‍या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने विद्रोही साहित्य संमेलने भरविण्यात येतात. साधारणत: दरवर्षी होणार्‍या या साहित्य संमेलनापूर्वी वर्षभर विविध कार्यक्रम सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित केले जातात. त्यात विविध जिल्ह्यात कवितेची शिबीरे, कविता संग्रह-कादंबरी…

आमदार नितेश राणे घेणार देवगड तालुक्यातील जलजीवन कामांचा आढावा

31 मे रोजी इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सकाळी 11 वाजता घेणार आढावा बैठक देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे 31 मे रोजी सकाळी 11 वाजता इंद्रप्रस्थ हॉलमध्ये देवगड तालुक्यातील जलजीवन मिशन कामाचा आढावा घेणार आहेत.जलजीवन मिशन मुळे प्रत्येक नागरिकाला पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र…

कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट ?

( ब्युरो न्युज ) :पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स संघ सातव्या अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे चेन्नई सुपर किंग्स संघानेचेन्नईच्या…

पडेल गावात पारवाडी स्मशानभूमी रस्ता कामाला प्रारंभ

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पडेल गावातील पारवाडी स्मशानभूमीच्या चिरेबंदी रस्त्याचे भूमिपूजन स्थानिक ग्रामस्थ सुहास बोडस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सरपंच भूषण पोकळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या रस्त्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 50 हजार निधी खर्च करण्यात येणार आहे. दुसऱ्या…

error: Content is protected !!