दिनेशकुमार बुधराम साय पैकरा या छत्तीसगढमधील निराधार बांधवाचे संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दि.२८ जुलै,२०२४ रोजी संविता आश्रमात दाखल करण्यात आलेल्या छत्तिसगढ मधील दिनेशकुमार बुधरामसाय पैकरा (वयः३१) या निराधार बांधवाचे नुकतेच निरधारासाठी काम करणाऱ्या सविता आश्रम या संस्थेच्या वतीने कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले. मु.नांदगाव, तोंडवली ता. कणकवली येथे २८ जीलै रोजी दुपारी ३-३० चे दरम्यान बेवारस स्थीतीत फिरताना आढळलेल्या या बांधवाचे नातेवाईक न्यायला येईस्तोवर सुरक्षिततेसाठी पोलीसांनी त्यास आश्रमात दाखल केले होते.

दिनेशकुमारचा भाऊ भोजराज पैकरा यांनी आश्रमात येवून त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांचेसह आश्रमचे व्यवस्थापक देवू सावंत, सोशल वर्कर, केअर टेकर विजय नाईक, व दिनेशकुमारचे भाऊ भोजराज पैकरा हे उपस्थीत होते. ज्यांचे या जगात कोणी नाही. त्यांचेसाठी जीवन आनंद संस्था आहे.असे ब्रीद घेवून जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टिमचे कार्य सुरू आहे.

error: Content is protected !!