बाळू माने मित्रमंडळ MHO7 आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

67 रक्तदात्यांनी रक्तदान करत महामानव, क्रांतीकारकांना केले अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : देशासाठी ज्या महामानवांनी क्रांतिकारकांनी योगदान देत आपल्या जीवनाचे बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळू माने मित्रमंडळ MH07 च्या वतीने रक्तदान शिबिर 31 जुलै रोजी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात तब्बल 67 रक्तदात्यांनी अमूल्य रक्तदान करून देशाच्या महामानव आणि क्रांतिकारकांना अभिवादन केले. समाजासाठी व आपल्या जिल्ह्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने बाळू माने मित्रमंडळाच्या वतीने 31 जुलै रोजी रोजी सामाजिक भावनेने रक्तदान शिबिर आयोजन केले होते. कोणतीही राजकीय अभिनिवेश न बाळगता केवळ समाजकारणामध्ये अग्रेसर पणे भाग घेऊन सर्वसामान्य जनतेच्या गरजा ओळखून अशा उपक्रमांना बाळू माने मित्रमंडळ ने सुरुवात केली आहे. त्यासाठी ग्रुप मधल्या सदस्यांचा उस्फूर्तपणे पाठिंबा मिळाला. या रक्तदान शिबिरामध्ये नेपाळ मधील सुजन घीमिरे यांनी पण रक्तदान केले आहे.या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक जाणिवांची एक नवीन चळवळ उभी होत आहे. त्याच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत.एक महिन्यापूर्वी एका मुलीला आर्थिक मदतिची गरज होती. ती आर्थिक मदत उभी करून गोवा बांबुळी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या आजारी मुलीकडे देण्यात आली होती. अशा वेगवेगळ्या उपक्रमामुळे बाळू माने मित्र मंडळाचे सगळीकडे कौतुक होत आहे. श्री. बाळू माने यांनी सर्व रक्तदाते यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

error: Content is protected !!