तो खड्डा बांधकाम विभागाने तातडीने बुजवला

उपअभियंता जोशी यांची कार्यतत्परता

वैभववाडी (प्रतिनिधी) : घाट परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात मोरीवर रस्त्याच्या मध्यभागी बुधवारी भगदाड पडले होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र बांधकाम विभागाने तातडीने सिमेंट काँक्रीटमेंट हे भागदाड भरले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. करुळ घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे सर्व वाहतूक भुईबावडा घाट मार्गे सुरू आहे. बुधवारी भुईबावडा घाटात मोरीच्या ठिकाणी रस्त्यात भगदाड पडले होते. भगदाड जवळपास ७ ते ८ फुट खोल होते. भगदाडातून मोरीचे पाईप दिसत आहेत.ही माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने या भगदाड सिमेंट सिमेंट काँक्रेट ने भरून तात्काळ उपाययोजना केली.त्यामुळे घाटातील वाहतूक सुरळीत झाली आहे.

error: Content is protected !!