आदर्श विद्यामंदिर भुईबावडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आदर्श विद्या मंदिर भुईबावडा येथील विद्यार्थ्यांना थोर व्यक्तिमत्त्वाची माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळावा याकरता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असा दुहेरी कार्यक्रम संपन्न झाला, याकरिता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, सांगुळवाडी येथील कृषिदुतांनी भुईबावडा येथे ‘वकृत्व स्पर्धेचे’ आयोजन केले होते. प्रतिमेचे पूजन अध्यक्ष पद भूषवलेल्या मुख्याध्यापिका अमृता रावराणे यांच्या हस्ते झाले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता वकृत्व स्पर्धा घेण्यात आली . वकृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे आयोजन सांगुळवाडी उद्यानविद्या महाविद्यालयाचे कृषिदुत , गणेश जाधव, महेश भिसे ,कृष्णात बामणे , ऋषिकेश शिंगटे ,ऋतुराज थोरात , प्रथमेश कोळेकर , अभिजित इंगळे, नागेश शिर्के यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. कामतेकर, कार्यक्रम समन्वयक पी. एस. सावंत, यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रम प्रसंगी शाळा विद्यार्थी त्याचबरोबर मुख्याध्यापक कर्मचारी उपस्थित होते. कृषीदूतांनी आयोजन केलेल्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

error: Content is protected !!