Category बातम्या

अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुक्तांगण प्री स्कूल, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कणकवली जानवली येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुक्तांगण प्री स्कूल, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कणकवली, जानवली येथे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता…

केंद्रीय बंदरे जहाजबांधणी, जलमार्ग मंत्री आणि महाराष्ट्राचे बंदरे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंची भेट

महाराष्ट्राच्या जलमार्ग विकासाला मिळणार बूस्टर डोस नवी दिल्ली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा…

सुनीता घाडीगावकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली, मधलीवाडी येथील सुनीता शंकर घाडीगावकर (८१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. त्या गांगो देवस्थानचे पुजारी बाळा घाडीगावकर यांच्या आई होत्या.

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्रा देसाईचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो…

संदिप परब यांच्या नेतृत्वामुळे अनेक निराधारांच्या आयुष्यात आशेचा किरण

जीवन आनंद संस्थेच्या गोव्यातील तिसऱ्या ‘स्नेहदीप’ आश्रमाचे नानोडे येथे उद्घाटन उत्साहात खारेपाटण (प्रतिनिधी) : निराधार, बेघर व्यसनाधीन आणि मतिमंद व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्थेच्या गोव्यातील तिसऱ्या ‘स्नेहदीप’ आश्रमाचे” उद्घाटन रविवारी नानोडे, गोवा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्थानिक…

महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवे – रिया गांवकर

घाडीगांवकर समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महापुरुषांच्या विचारांचा जागर शाळांमध्ये व्हायला हवा. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करायला हवेत. तरच भारत देश महासत्ता बनेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध वकृत्वपटू रिया गांवकर हिने केले. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई…

शर्ट फाडण्याचा प्रकार भोवला ; दोघांना बेदम चोपले

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमालकाच्या मुलाचा शर्ट फाडण्याचा प्रकार एका राजकीय कार्यकर्त्याला चांगलाच भोवला असून शर्ट फाटलेल्या युवकाच्या मित्रांनी त्या कार्यकर्त्याला सारी बंधने “पार” करत एका बार मध्ये बेदम चोपले. राजकीय कार्यकर्त्यासोबत राज्यातील विरोधी पक्ष सदस्य असला…

मर्डे ग्रामपंचायत नाव बदलासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतचे नाव मसुरे मर्डे करावे अशी मागणी राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या जवळ मसुरे ग्रामविकास संघ मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यानी केली. दरम्यान याबाबत ग्रामविकास विभागाकडुन…

घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

​बांदा (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात बुधवार २९ जुलै रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.​यनिमित्त ​सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा व धार्मिक विधी, ​दुपारी आरती, तीर्थप्रसाद व…

डोंगरपाल श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव

​बांदा (प्रतिनिधी) : प.पू. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज स्थापित डोंगरपाल – डिंगणे येथील श्रीस्वामी समर्थ सेवा मठामध्ये बुधवार २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ​यनिमित्त…

error: Content is protected !!