किर्लोस बंधाऱ्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ

किर्लोस बंधाऱ्यामुळे विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ ; निर्माण झाली शाश्वत सिंचन व्यवस्था

पोईप (प्रतिनिधी) : किर्लोस येथे गावातून जाणाऱ्या गडनदीला पाणी अडविण्यासाठी फळ्या टाकून बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. लघु पाट बंधारे खात्या मार्फत हा बंधारा बांधून मोठ्या प्रमाणात पाणी अडविले आहे. या बंधार्यारला माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत, किर्लोसचे माजी सरपंच प्रदीप सावंत व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली. विस वर्षापुर्वी ब्रिगे. सुधीर सावंत यांनी किर्लोस येथील ब्रिजकम बंधारा शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यानंतर त्याला गेल्या वर्षी माजी आमदार वैभव नाईक यांनी त्या बंधार्या च्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. बंधार्याषच्या मंजुरीसाठी किर्लोसचे माजी सरपंच प्रदीप सावंत यांनी खास प्रयत्न केले आहेत. लघु पाट बंधारे खात्या मार्फत सद्या बंधार्याठला फायबरच्या फळ्या टाकून दहा फुट खोल व जवळपास 4 कि. मी. लांब एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून त्या पाण्याचा वापर किर्लोस व गोठणे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. कुळीथ, भुईमूग, चवळी, नाचणी, भाजीपाला अशा प्रकारच्या उन्हाळी पिकांसाठी शाश्वत सिंचन उपलब्ध झाल्यामुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तसेच साठवणूक केलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी किर्लोसकर ब्रदर्स कंपनी मार्फत सिंचन योजना राबविण्याचे नियोजित आहे. आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 80 विहीरींच्या पाण्याच्या पातळीत 5 ते 6 फुटांनी वाढ झाली आहे. किर्लोस, गोठणे, पिसेकामते गावात जवळपास 300 एकर पेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली आले असून त्यामध्ये किर्लोस कृषि विज्ञान केंद्राद्वारे भुईमूग पिकाची 50 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली असून कादरी लेपाक्षी या भुईमूगाच्या हळव्या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून केंद्राद्वारे शेतकर्यां ना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या हंगामात शेतकर्यां ना भुईमूग, कुळीथ, नाचणी, चवळी व भाजीपाला पिकांचे चांगले उत्पादन मिळणार आहे. बंधार्याेची व पिकांची पाहणी माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांनी करून समाधान व्यक्त केले. यावेळी किर्लोसचे माजी सरपंच प्रदीप सावंत, केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, डॉ. केशव देसाई व कर्मचारी नरेंद्र सावंत, झिलू घाडीगावकर, संशोधन सहाय्यक सिद्धेश घाडीगावकर व शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!