कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या बहिणीच्या गावी करूळ येथे गेलेल्या मंदाकिनी भिकाजी राणे (वय 88, रा. माईन, घाडीवाडी, ता. कणकवली) या वृद्धेचा मृतदेह 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता करूळ फोफेवाडी येथील एका ग्रामस्थाच्या विहिरीच्या बाजूला सापडून आला. याबाबत मयत मंदाकिनी हिचा पुतण्या मिलिंद कांशीराम राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मयत मंदाकिनी ही 9 फेब्रुवारी रोजी माईन गावातून आपल्या बहिणिकडे कणकवली तालुक्यातील करूळ गावात गेली होती. करूळ मधून 23 फेब्रुवारी रोजी मंदाकिनी ही माईन येथे जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती माईन मधील घरी न पोचल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता 25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मंदाकिनी हिचा मृतदेह सापडून आला. मिलिंद राणे यांच्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











