पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून वाभवे-वैभववाडी नगरपंचायत ला 3 कोटी 33 लाख निधी मंजूर

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वाभवे वैभववाडी नगरपंचायतीला नगरोत्थान मधून 3 कोटी 25 लाखाची विकास कामे मंजूर झाली आहेत. या भरघोस निधीतुन वैभववाडी शहरातील  विविध विकास कामे केली केली जाणार आहेत रस्ते, पथदीप, सुशोभीकारण बंदिस्त गटारे अशा विविध कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन  शहराला एक प्रकारे न्याय दिला आहे. अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे 

    नगरपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा रावराणे बोलत होत्या. यावेळी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आतापर्यंत मोठया प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. आता ३ कोटी २३ लाखाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये वैभववाडी नगरपंचायत येथील सोलर हायमष्ठ पतदिव्य उभारणे व पाणीपुरवठा विहिरीवर ग्रीड आधारित सोलर यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये,  प्रभाग क्रमांक 17 मध्ये सतीश रावराणे घर ते भैरू गुरखे  घरापर्यन्तचा रस्ता तयार करण्यासाठी  50 लाख,  प्रभाग क्रमांक 17 मध्ये लांजवळवाडी येथे पिण्याच्या पाण्याची विहीर बांधणे 25 लाख, प्रभाग क्रमांक एक मध्ये कलादालणाची सुधारणा करणे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दहा लाख रुपये,प्रभाग क्रमांक 16 मध्ये आमकरवाडी पर्यंत रस्ता तयार करणे 30 लाख, नगरपंचायत ते मच्छी मार्केट बंदीस्त गटार बांधणे   25 लाख, आणि मच्छी मार्केट ते महाकाली कॉम्प्लेक्स पर्यंत बंदीस्त गटार बांधण्यासाठी 25 लाख, प्रभाग क्रमांक एक मध्ये करंगुटकर घर ते बोभाटे घरापर्यंत रस्ता तयार करणे 30 लाख, प्रभाग क्रमांक 15 मध्ये आदिष्टी देवी मंदिर येथे सुशोभीकरण  करणे 20 लाख , नगरपालिका रस्त्यावरती थेरमो पॉईंट साठी दहा लाख रुपये,  असा सुमारे 3 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी दिली.

error: Content is protected !!