Category बातम्या

मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

मसुरे (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे व शाळा व्यवस्थापन समिती देऊळवाडाच्या सहकार्याने प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व विद्यार्थी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी डाॅ. वीणा मेहेंदळे, आरोग्यसेवक सावजी, रसाळ मॅडम, आशा स्वयंसेवका अंकिता मेस्त्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ…

आषाढी एकादशी निमित्त ‘पालखी रिंगण’ सोहळा

कासार्डे विद्यालयात भरला वैष्णवांचा मेळा तळेरे (प्रतिनिधी): आषाढी एकादशीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थी व शिक्षकांनी पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम!…

खारेपाटण विभागात मोदी @ ९ अभियानचा शुभारंभ

आमदार नितेश राणे यांनी साधला प्रभावी व्यक्ती व कार्यकर्त्यांशी संवाद खारेपाटण (प्रतिनिधी): मोदी @ ९ या अभियानांतर्गत भाजपा आमदार नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी “संपर्क से समर्थन” या अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण विभागातील चिंचवली,शेर्पे,वायगणी, शिडवणे व खारेपाटण आदी गावातील…

तिर्लोट मोहूळ शाळेत निघाली पुस्तकदिंडी

देवगड (प्रतिनिधी): आपली संस्कृती , परंपरा मुलांमध्ये रुजावी व वाचन संस्कृतीचे महत्व मुलांना समजावे यासाठी जि.प.तिर्लोट मोहूळ ता. देवगड शाळेत आज आषाढी एकादशीचे औचीत्य साधून पुस्तकदिंडी काढण्यात आली..यामध्ये शाळेतील सर्व मुले पारंपारिक पोषाख घालून सहभागी झाली होती. दिंडीत मुले अगदी…

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशोत्सव सोहळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये बुधवार दिनांक 28 जून रोजी इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा नुकताच संपन्न…

आचरा पोलिस स्टेशनचे प्रभारी स. पो. नि-अनिल व्हटकर यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त हिंदू, मुस्लिम बांधवाना शुभेच्छा…!

आचरा (प्रतिनिधी): आज पंढरपूर यात्रा म्हणजे आषाढी एकादशी हिंदूचा पवित्र सण, याचे औचित्य साधत आचरा पोलिस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी आचरा रामेश्वर मंदिर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेत हिंदू बांधवाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…

मुंबई – गोवा महामार्गावर निवळीनजीक रस्ता खचला

आचरा (प्रतिनिधी): पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गाला दणका दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी यादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला रस्ता खचला आहे. सद्यस्थितीत एका बाजूने वाहतूक सुरू आहे . बुधवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे हातखंबा…

अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग…

वराडकर हायस्कूल कट्टा येथे आषाढी एकादशी निमित्त चित्र प्रदर्शनास प्रतिसाद आचरा (प्रतिनिधी): आषाढी एकादशी निमित्त वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे “रंगी रंगला श्रीरंग” या वारी संदर्भातील चित्र प्रदर्शनाचे आयोजन काल करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अक्षर वारी, वारकऱ्यांची…

महाराष्ट्रातील कारागृहातून पार पडलेल्या अभंग व भजन स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व बंद्यांना विशेष माफी

सिंधुदुर्ग (रोहन भिऊंगडे) : महाराष्ट्र कारागृह विभागाचे “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रीद वाक्याचा उद्द्येश साध्य होण्याच्या दृष्टीने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाण ,पुणे व महाराष्ट्र कारागृह विभाग यांचे संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यांकरिता राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या…

नेरूर चौपाटी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी उत्सव

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर चौपाटी या ठिकाणी असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात काल सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. रात्री दहा वाजता कलेश्वर महाराजांची पालखी ढोल ताशांच्या गजरात मध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरात चौपाटी या ठिकाणी आली. आज सकाळी मंदिरात धार्मिक…

error: Content is protected !!