वराडकर हायस्कूल कट्टा येथे आषाढी एकादशी निमित्त चित्र प्रदर्शनास प्रतिसाद
आचरा (प्रतिनिधी): आषाढी एकादशी निमित्त वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे “रंगी रंगला श्रीरंग” या वारी संदर्भातील चित्र प्रदर्शनाचे आयोजन काल करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अक्षर वारी, वारकऱ्यांची विविध पोट्रेट्स, वेगवेगळ्या माध्यमातून पांडुरंगाची काढलेली चित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली. या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी केले, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या वतीने डॉ. प्रसाद देवधर यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी सुस्वर भक्ती गीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी शुभेच्छा दिल्या. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल नाईक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक व सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक कला शिक्षक समिर चांदरकर यांनी तर सुत्रसंचालन मुख्याध्यापक संजय नाईक यांनी केले.

















