तिर्लोट मोहूळ शाळेत निघाली पुस्तकदिंडी

देवगड (प्रतिनिधी): आपली संस्कृती , परंपरा मुलांमध्ये रुजावी व वाचन संस्कृतीचे महत्व मुलांना समजावे यासाठी जि.प.तिर्लोट मोहूळ ता. देवगड शाळेत आज आषाढी एकादशीचे औचीत्य साधून पुस्तकदिंडी काढण्यात आली..यामध्ये शाळेतील सर्व मुले पारंपारिक पोषाख घालून सहभागी झाली होती. दिंडीत मुले अगदी तल्लीन होऊन नाचत होती यामध्ये पालकवर्गही अगदी आनंदाने सहभागी होऊन नृत्य करण्यात दंग झाला….पालखीमध्ये विविध पुस्तके ठेऊन वाचाल तर वाचाल हा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला.यामध्ये माजी पं.स.सदस्य सुनिल तिर्लोटकर .तिर्लोट उपसरपंच प्रताप तिर्लोटकर ,शा.व्य. स अध्यक्ष नितीन जाधव ,ग्रा.प. सदस्या सानवी तिर्लोटकर , सचिन सावंत ,माता पालक व ग्रामस्थ आनंदाने सहभागी झाले. शाळेत एकच शिक्षक असतानाही पालकांच्या सहकार्यामुळे पुस्तकदिंडीची यशस्वी सांगता झाली. सचिन सावंत यांनी सर्वांना खाऊ वाटप केले.

error: Content is protected !!