आमदार नितेश राणे यांनी साधला प्रभावी व्यक्ती व कार्यकर्त्यांशी संवाद
खारेपाटण (प्रतिनिधी): मोदी @ ९ या अभियानांतर्गत भाजपा आमदार नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी “संपर्क से समर्थन” या अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण विभागातील चिंचवली,शेर्पे,वायगणी, शिडवणे व खारेपाटण आदी गावातील प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या नागरिक तसेच भाजपा पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांची घरोघरी जावून प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे,कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे, प्रमोद रावराणे, अभियानाचे संयोजक संदीप सावंत,माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार,माजी पं स.सभापती दिलीप तळेकर, भाऊ राणे,रफिक नाईक,सूर्यकांत भालेकर,माजी सरपंच रमाकांत राऊत, इस्माईल मुकादम,उपसरपंच महेंद्र गुरव,राजेंद्र वरूणकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या अभियानात अंतर्गत आमदार नितेश राणे यांनी खारेपाटण मधील सुधीर कुबल,परवेज पटेल,डॉ.मालंडकर आदी प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या कार्यकर्ते व नागरिक यांची भेट घेऊन त्याच्याशी संवाद साधला व चर्चा केली. तसेच चिंचवली गावातील शिरसेकर गुरुजी,शेर्पे गावातील एकनाथ शेलार,वांयगणी गावातील संभाजी बाणे,शिडवणे गावातील मनोहर कोकाटे या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी जाऊन मोदी @९ या अभियानाची माहिती देत गेल्या नऊ वर्षाच्या काळात केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांच्या नेतृत्वखाली जनतेसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली. त्याप्रसंगी माननिय आमदार नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत खारेपाटण विभागातील कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी संवाद साधत मोदी @ ९ अभियानाची पत्रके नागरिक व कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली.यावेळी भाजप पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












