Category कोकण

हडी मुळपुरुष मंदिर व पाषाण मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा २ मे पासून

मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील हडी येथील मेतर, लोणे,मेथर व कालमेथर कुटुंबियांच्या मुळपुरुष मंदिर व पाषाण मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २मे ते ३मे २०२३रोजी करण्यात येणार आहे. २ मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, पाषाण मूर्तीचे कालिकामाता मंदिरा पासून मुळपुरुष मंदिरा पर्यंत मिरवणुकीने आगमन.दुपारी…

रेल्वेच्या धडकेत 3 गव्यांचा मृत्यू ; मडुरा येथील घटना

वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षिरसागर यांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा बांदा (प्रतिनिधी): कोकण रेल्वे मार्गावर मडुरा काळा आंब्याजवळ पहाटेच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलदगती रेल्वेची धडक बसून तीन गवे ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. मंगळवारी पहाटे गोव्याहून मुंबईच्या…

कालवीबंदर येथील कासव प्रेमी हेमंत शेलटकर यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला गौरव

केळुस कालवीबंदर येथिल समुद्र किनाऱ्यावर ऐतिहासिक कासव संवर्धन हेमंत शेलटकर यांनी कासव संवर्धनातून जपली सामाजिक बांधिलकी संवर्धनातून १ हजार २७३ कासव पिल्ले सोडली समुद्रात वेंगुर्ले (प्रतिनिधी): केळुस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर यांनी सामाजिक कर्तव्य मानून अलौकिक असे कासव संवर्धन कार्य…

नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबा जत्रा 7 मे रोजी

जत्रा नियोजनासाठी बैठक संपन्न नांदगाव (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कळंबा देवाची जत्रा यावर्षी रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे.या संपूर्ण जत्रेच्या नियोजनासाठी आज कोळंबा मंदिर नांदगाव येथे कोळंबा…

धावत्या मोटरसायकलवर बिबट्याचा हल्ला ; मोटरसायकलस्वार जखमी

देवगड (प्रतिनिधी): पडेल बाणेवाडी येथील मंगेश सुधाकर बाणे 33 हे बिबट्या वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत सदरची घटना ही सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पडेल बाणेवाडी येथील मंगेश बाणे हे पडेल कॅन्टीन वरून आपल्या घरी बाणेवाडी येथे…

तळेरे विद्यालय परिसरातील झाडावरती “पक्षांसाठी दानापाण्याची” सोय

विद्यार्थ्यांची पक्षी व निसर्गाविषयी सामाजिक बांधिलकी तळेरे (प्रतिनिधी): ऐन उन्हाळ्यात पक्षांचे पिण्याच्या पाण्या अभावी होणारे हाल आणि गैरसोय लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी झाडांना जागोजागी करवंट्यामध्ये पाणी आणि खाद्याची सोय उपलब्ध केली आहे.वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे आणि निसर्ग मित्र परिवाराच्या…

देवगड मध्ये झणझणीत मिसळचा ठसका

आम.नितेश राणे यांच्या हस्ते देवगड मिसळ महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ मिसळ महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक यावेत, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. देवगड तालुक्यात पर्यटनवृद्धी व्हावी, याकरिता जे जे…

सिंधुदुर्गात 13 ते 15 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, गारा पडण्याची, विजा चमकण्याची व 45 ते 55 किमी प्रती तास…

ह.भ.प. विजय बाळकृष्ण राणे यांची ‘कोकण विभाग सचिव’ या पदावर नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी): विश्व वारकरी संघ, पंढरपूर, यांच्यावतीने कासार्डे गावातील दाबवाडी मधील ह.भ.प. विजय बाळकृष्ण राणे (ग्रामपंचायत सदस्य) यांची ‘कोकण विभाग सचिव’ या पदावर नियुक्ती करण्यात आली. सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड असल्याने त्यांची या महत्वाच्या पदावर विश्व् वारकरी संघ ह.भ.प.…

कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालयात धिंगरी अळंबीचे यशस्वी उत्पादन

नांदगाव (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी “अळिंबी लागवड तंत्रज्ञान” या प्रयोगातून शिक्षण उपक्रमांतर्गत धिंगरी अळिंबीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. अळिंबी ही एक प्रकारची पौष्टिक बुरशी असून तिचे मानवी आहारात विशेष महत्व आहे. मधुमेह,…

error: Content is protected !!