कालवीबंदर येथील कासव प्रेमी हेमंत शेलटकर यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला गौरव

केळुस कालवीबंदर येथिल समुद्र किनाऱ्यावर ऐतिहासिक कासव संवर्धन

हेमंत शेलटकर यांनी कासव संवर्धनातून जपली सामाजिक बांधिलकी

संवर्धनातून १ हजार २७३ कासव पिल्ले सोडली समुद्रात

वेंगुर्ले (प्रतिनिधी): केळुस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर यांनी सामाजिक कर्तव्य मानून अलौकिक असे कासव संवर्धन कार्य करत असल्याने त्याच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी घेऊन हेमंत शेलटकर यांना संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन “गौरव” केला आहे. तालुक्यातील केळुस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर यांनी कालवीबंदरच्या समुद्र किनाऱ्यावर प्रथमच कासव संवर्धनात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.आज कासवांचे संवर्धन काळाची गरज असून यासाठी कोकणात अनेक ठिकाणी संवर्धन मोहीम राबविल्या जात आहेत.
त्याच उद्देशाने वेंगुर्ले तालुक्यातील केळुस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर या कासवप्रेमीने नवी संकल्पना मांडताना सीता बीच कॉटेज समोर प्रथम कासवांची ५३ अंडी संवर्धित केली. यात एकूण २४ घरटी बांधून त्याद्वारे आजपर्यंत एकूण २ हजार ७३८
सीता बीच कॉटेज येथेच संवर्धित केली.यातून १ हजार २७३ कासव पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. सूर्यकांत मनोहर सावंत, वनरक्षक मठ यांच्या देखरेखीखाली थंडी आणि धोक्याची तमा न बाळगता पूर्ण रात्र जागरण व पूर्ण समुद्रकिनारा फिरून कासवांच्या अंड्यांचे संवर्धन केले. या कालावधीत दोन वेळा बिबट्याचे सुद्धा दर्शन घडले. मात्र, कासवांच्या अंड्यांची सुरक्षा हे कर्तव्य मानून केळुस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. सामाजिक कर्तव्य मानून अलौकिक असे कासव संवर्धन कार्य हेमंत शेलटकर करत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने घेत शेलटकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर,उपाध्यक्ष समिल जळवी,जिल्हा सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर, मठ वनरक्षक सूर्यकांत मनोहर सावंत, ग्रामस्थ बजरंग ताम्हणकर,संदेश राऊळ,बाबुराव ताम्हणकर आदी ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते. तर हेमंत शेलटकर यांचे काही दिवसां पुर्वी वायंगणी येथील कासव महोत्सवात जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते हेमंत शेलटकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!