ह.भ.प. विजय बाळकृष्ण राणे यांची ‘कोकण विभाग सचिव’ या पदावर नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी): विश्व वारकरी संघ, पंढरपूर, यांच्यावतीने कासार्डे गावातील दाबवाडी मधील ह.भ.प. विजय बाळकृष्ण राणे (ग्रामपंचायत सदस्य) यांची ‘कोकण विभाग सचिव’ या पदावर नियुक्ती करण्यात आली.

सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड असल्याने त्यांची या महत्वाच्या पदावर विश्व् वारकरी संघ ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख (संस्थापक, अध्यक्ष) ह.भ.प. तुकाराम महाराज चवरे (राष्ट्रीय अध्यक्ष) ह.भ.प. बापूसाहेब महाराज ढगे (राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांच्यावतीने नेमणूक करण्यात आली. यावतीने संपुर्ण कोकण विभागाच्या वतीने ह.भ.प. विजय बाळकृष्ण राणे यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे…

error: Content is protected !!