मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील हडी येथील मेतर, लोणे,मेथर व कालमेथर कुटुंबियांच्या मुळपुरुष मंदिर व पाषाण मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २मे ते ३मे २०२३रोजी करण्यात येणार आहे. २ मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, पाषाण मूर्तीचे कालिकामाता मंदिरा पासून मुळपुरुष मंदिरा पर्यंत मिरवणुकीने आगमन.दुपारी पाषाण मुर्तीची प्रतिष्ठापना,३मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, भजन व दुपारी महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मुंबई,पुणे येथील मेतर,लोणे,मेथर, कालमेथर परिवारातील सदस्य उपस्थित रहाणार आहेत.या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन समस्त मेतर, लोणे,मेथर,कालमेथर परिवारा कडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सविस्तर माहिती साठी देविदास कालमेथर (९४०३३६८५९१),कमलेश मेतर (९४२२०५४८३६),सुधीर मेतर (९४२१२६०७९४),मंगेश लोणे येथे संपर्क साधावा.