नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबा जत्रा 7 मे रोजी

जत्रा नियोजनासाठी बैठक संपन्न

नांदगाव (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कळंबा देवाची जत्रा यावर्षी रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे.
या संपूर्ण जत्रेच्या नियोजनासाठी आज कोळंबा मंदिर नांदगाव येथे कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. यावेळी कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, सुनिल आंबेरकर, दिलिप फोंडके,दिपक महाडिक , शामसुंदर मोरये, महादेव मोरये,बबन मोरये, दाजी सदडेकर, ऋषिकेश मोरजकर अशोक बिडये, महेंद्र हडकर आदी उपस्थित होते. या बैठकीत कामांची विभागणी करुन विशेषतः त्या दिवशी मटण भाकरी प्रसाद म्हणून दिला जातो यासाठी भाकरी ही नांदगाव,तोंडवली, बावशी,असलदे,ओटव ,माईण, सावडाव,बेळणे आदी गावातील घरोघरी भाकरीचे पीठ दिले जाते.यासाठी जवळपास 700 किलो भाकरी चे पिठ तयार करून घरोघरी जाऊन वाटले जाते. बरेच भक्त गण स्वतः हून मंडळाकडून पिठ घेऊन जात श्रध्देने भाकरी भाजून देतात.

error: Content is protected !!