विनायक(बाळू) मेस्त्री, विनायक सापळे यांचे अनमोल मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी): अनुभव शिक्षा केंद्र आणि गोपुरी आश्रम, वागदे यांच्या मार्फत जागर विचारांचा, संवर्धन मूल्यांचे या शिबिराचे उद्घाटन गोपुरी आश्रम संचालिका, नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांच्या हस्ते गोपुरी आश्रम बहूउदेशिय हॉल , वागदे येथे झाले. यावेळी अनुभव शिक्षा केंद्र जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, अनुभव साथी राहुल कांबळे, विशाल गुरव, संविधान संवादक सुजय जाधव उपस्थित होते. या उद्घाटन प्रस्तावनेवेळी सहदेव पाटकर यांनी अनुभव शिक्षा केंद्र आणि कार्यक्रम रूपरेषा मांडली. यामध्ये त्यांनी अनुभव शिक्षा केंद्र प्रक्रिया जे युवकांसाठी व्यासपीठ आहे. मुल्यांची कास धरून युवकांमार्फत समाज बदल घडविला जातो. मुंबरकर यांनी गोपुरीचे कार्य सांगीतले. अशी शिबीर होणे काळाची गरज आहे आणि यांमध्ये युवकांचा सहभाग हवा. तुम्ही सर्व युवक मिळून जो उपक्रम राबवीत आहात तो खरच अभिमानास्पद आहे असे सांगीतले. १३ ते १६ जून पर्यंत चाललेल्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. यामध्ये लीडरशिप आणि क्रिटीकल थिंकिंग यावर साथी सहेदव आणि साथी राहुल यांनी संवाद साधला. शिबिराच्या दुसर्या दिवशी श्रमदान करण्यात आले. यावेळी गोपुरी परिसरात केळी लागवड करण्यात आली. त्यानंतर संविधान संवादक सुजय जाधव यांनी संवादाची सुरूवात भारताचा प्राण आहे संविधान ,सुनील स्वामी सरांच्या अभंगाने सुरूवात केली. ही प्रास्ताविक किती वाक्यांची आहे ह्या प्रश्नाने सुरूवात. आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण प्रास्ताविकेतील काही मूल्यांवर चर्चा केली. लडडू ही शाॅर्ट फिल्म दाखवत धर्मनिरपेक्षता मूल्यांवर संवाद साधला. दुपारच्या सत्रात ग्रामपंचायत बजेट- जाणवली ग्रामसेवक अर्चना लाड यांनी मांडले. साथी रुपाली कदम यांनी मैत्री, प्रेम आणि आकर्षण याबाबत संबोधले. शिबिराच्या तिसर्या दिवशी साथी अजरुद्दिन आणि साथी दिपाली यांनी संविधान मांडले. यावेळी त्यांनी संविधान समज-गैरसमज, संविधान बनण्याची प्रक्रिया आणि उद्देशिका मूल्यांचे अर्थ स्पष्ट केले. सायंकाळच्या सत्रामध्ये लिंग समानता या विषयावर सरिता पवार यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित युवक-युवती सोबत साथी सहदेव यांनी पुढील प्लानिंग केले. यामध्ये दोन महिन्यात कोणकोणते उपक्रम राबवू शकतो याची मांडणी केली. शिबिराचा समारोप वेळी गोपुरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, संचालक विनायक मेस्त्री, विनायक सापळे, सिद्धेश कदम आणि सहदेव पाटकर उपस्थित होते. यावेळी मुंबरकर यांनी गोपुरी अश्या उपक्रमांसाठी सदैव मदत करेल. आप्पासाहेब यांचे विचार युवकानी आत्मसात करून ते समाजामध्ये पोचविणे गरजेचे आहे. सिद्धेश कदम आणि विनायक(बाळू) मेस्त्री यांनी शिवाजी कोण होता, शाहू महाराज हे पुस्तक युवकांना दिले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेंद्र मुंबरकर, विनायक(बाळू) मेत्री आणि अनुभव शिक्षा केंद्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.













