बांदा (प्रतिनिधी) : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पल्स पोलिओ मोहीमेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. २८ जून या दिवशी शून्य ते पाच वर्षांतील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण डोस देण्यात येत आहे. आज सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागामार्फत पल्स पोलिओ मोहीमेची सुरूवात झाली आहे. स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सुद्धा यावेळी उपस्थित रहात या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, अंक्षकालील परीचर, आशा सेविका, निलेश देसाई , अशोक नेवगी उपस्थित होते.


















