कणकवली-आचरा मार्गावरील पाण्याचा निचऱ्याची उपाययोजना करा

कलमठ ग्रामपंचायतीकडे धीरज मेस्त्री यांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ बाजारपेठेतील कणकवली-आचरा मार्गावर पावसाचे पाणी साचून राहत आहे. परिणामी रस्त्यावर खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांनी कलमठ ग्रा. पं. प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू झाला आहे. कलमठ बाजारपेठ हद्दीत कणकवली-आचरा मार्गावर पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्याच पाण्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे. पाण्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी ग्रा. पं. प्रशासनाने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मेस्त्री यांनी केली आहे. सहा.शिक्षक प्रसाद मसुरकर यांनी केले.

error: Content is protected !!