वैभववाडी (प्रतिनिधी) : ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ प्रतिबंधक लस देण्याच्या राष्ट्रीय मोहिमेला आज, रविवार दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. प्रा. आरोग्य केंद्र, वैभववाडी येथे आयोजित लसीकरण शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे यांच्या हस्ते एका बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आले.
यावेळी पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर आणून लस देण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य विभागाच्या या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना लसीकरणासाठी आणावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी वैभववाडी डॉ पवन राऊत, तालुका आरोग्य सहाय्यक आनंदा चव्हाण,
आरोग्य निरीक्षक नितीश पाटील आरोग्य सहायिका नूतन जांभवडेकर,आरोग्य सेविका मनीषा मिटबावकर
आशा स्वयंसेविका कुंभार, करकोटे व माता,पालक उपस्थित होते.












