आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त घरोघरी शासनाच्या योजना पोहचविणार – रमाकांत राऊत

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली देवगड व वैभववाडी या विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण विभागातील गरजू लोकांना शासनाच्या विविध योजना पोहचविण्याचे काम करणार असल्याचे खारेपाटण गावचे माजी सरपंच व भारतीय जनात पार्टीचे कार्यकर्ते रमाकांत राऊत यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस सर्वत्र उस्थाहाने साजरा होत असताना खारेपाटण येथे मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच शासनाच्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे श्री रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!