आ. नितेश राणेंच्या वाढदिनी वैभववाडी तालुक्यातील 10 वी 12 वी तील गुणवंतांचा होणार सत्कार

वाभवे वैभववाडी शहरातील प्राथमिक शाळेत खाऊवाटप

माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असून 10 वि 12 वि परीक्षेत वैभववाडी तालुक्यात प्रथम 3 नंबर ने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच वैभववाडी शहरातील सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात येणार आहे. माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून महाराणा प्रताप कलादालन हॉल वैभववाडी येथे सकाळी 11 वाजता संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाला वैभववाडी तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कणकवली विधानसभा प्रचारप्रमुख तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संताजी रावराणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!