देवगडमध्ये पावसाची  दमदार सुरूवात 

साळशी येथे घरावर झाड पडून १ लाखाचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी) : वगडमध्ये शुक्रवारपासून मान्सुनच्या पावसाने दमदार सुरूवात केली असून  साळशी येथे शनिवारी सकाळी नंदकिशोर मिराशी यांच्या घरावर झाड पडून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे.

पावसाने शुक्रवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली. पावसाने सुरूवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी शनिवारी सकाळी नंदकिशोर दिनकर मिराशी यांच्या सामाईक घराच्या दर्शनी भागावर झाड पडल्याने सुमारे १ लाखाचे नुकसान झाले.सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नाही.शनिवारी सकाळी पावसाची ३० मिमी नोंद झाली.पावसाने सुरूवात केल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!