अर्जुन रावराणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक उदय दीनदयाळ यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक उदय रामचंद्र दीनदयाळ (८०) यांचे त्यांच्या मूळ गावी आडूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे नुकतेच दुःखद निधन झाले.

दीनदयाळ यांनी अर्जुन रावराणे विद्यालयात मराठी विषयाचे शिक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली. त्यानंतर याच विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून तब्बल नऊ वर्षे त्यांनी यशस्वीपणे काम पाहिले. शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षक व प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिक्षण क्षेत्रासह वैभववाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!