जेष्ठ पत्रकार विजय गांवकर यांना मातृशोक

सुनिता साबाजी गांवकर यांचे निधन ; सोमवारी होणार अंत्यसंस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : जेष्ठ पत्रकार विजय गावकर यांच्या मातोश्री श्रीम. सुनिता साबाजी गावकर ( वय ८६, रा. नाडकर्णीनगर, कलमठ, कणकवली ) यांचे निधन झाले. आपल्या कलमठ येथील राहत्या घरीच रविवार २२ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. गेले कांही दिवस त्यांचे प्रकृती स्वास्थ नाजूक झाले होते.

सुनिता यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातल्या (पाकिस्तान मधल्या) कराची येथे झाला होता. फाळणीच्या झळा त्यांनी बालवयातच सोसल्या होत्या. लग्नानंतर त्या मुंबई शहरात वास्तव्यास आल्या परंतु त्यांना त्यांच्या मूळ गाव दिगवळेची ओढ जास्त असल्यामुळे त्या पतीबरोबर वरचेवर दिगवळे येथे येत. अखेर त्यांनी नाडकर्णी नगर कलमठ येथे स्वतःचे घर बांधण्याचा आग्रह धरून या ठिकाणी घर बांधले आणि या ठिकाणी राहावयास आल्या.

विविध खाद्यपदार्थ तयार करणे, नवनवीन खाद्यपदार्थ शोधणे आणि ते इतरांना खाऊ घालणे हे त्यांना जास्त पसंत होते. कणखर व्यक्तिमत्व म्हणून त्या कुटुंबात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, नातसूना, पतवंडे आहेत. जेष्ठ पत्रकार विजय गांवकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर कणकवली येथील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!