प्रमोद ठाकूर याना विस्तार अधिकारीपदी बढती

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ग्रामविकास अधिकारी पदी कार्यरत असलेले प्रमोद राजाराम ठाकूर यांना विस्तार अधिकारी पदी बढती मिळाली असून जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ठाकूर यांना बढती आदेश देत त्यांचे अभिनंदन केले.विस्तार अधिकारी पदी बढती नुसार प्रमोद ठाकूर यांची कणकवली पं स च्या कृषी विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.प्रमोद ठाकूर हे सध्या कणकवली पंचायत समिती अंतर्गत सांगवे ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी पदी कार्यरत होते. पारदर्शी , प्रामाणिक आणि वक्तशीर कर्मचारी म्हणून प्रमोद ठाकूर यांची ओळख आहे.ग्रामसेवक पदापासून आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केल्यापासून लोकसेवक या भावनेने काम करताना जनतेच्या हाताला प्रमोद ठाकूर यांनी कायम प्राधान्य दिले. विस्तार अधिकारी पदी बढती मिळाल्याबद्दल कणकवली पं स चे गटविकवस अधिकारी अरुण चव्हाण यांनी प्रमोद ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, ग्रामसेवक प्रशांत वर्दम, ग्रामसेवक वैभव धुमाळे, ग्रामसेवक देवेंद्र नलावडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!