हेमंतकुमार तांबे यांना ‘भीमगर्जना राष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : बौद्धीय प्रगती मंडळ, ओसरगाव ग्रामीण शाखेचे अध्यक्ष हेमंतकुमार धर्माजी तांबे यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘भीमगर्जना राष्ट्रभूषण पुरस्कार – २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वातंत्र्य दिन तसेच ‘भीमगर्जना न्यूज’च्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हेमंतकुमार तांबे यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान त्यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची पोचपावती असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

‘भीमगर्जना राष्ट्रभूषण पुरस्कार – २०२६’ प्राप्त झाल्याबद्दल आयु. हेमंतकुमार धर्माजी तांबे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या हातून यापुढेही समाजहिताचे कार्य निरंतर घडत राहावे आणि त्यांच्या सामाजिक कार्याला नवनवीन यश व सन्मान मिळत राहावेत, अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या.

error: Content is protected !!