सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : उच्चशिक्षित बुद्धिजीवी राजकारणात आले तर निश्चितच विधायक राजकारण घडेल हा सर्वमान्य विचार.केंद्रीयमंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या व्हिजनरी विकासकार्याचा पाईक असणारे देवगड तालुक्यातील डॉ.अमोल जनार्दन तेली होय. त्यामुळेच राणे कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेले डॉ अमोल तेली यांनी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश केला. सध्या पडेल मंडल च्या भाजपा तालुकाध्यक्षदाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ अमोल तेली यांचे संघटन कौशल्य , सालस व्यक्तिमत्व सर्वांनाच भुरळ घालते.आमदार नितेश राणेंसाठी जीवाचे रान करायला नेहमीच सज्ज असणारा त्यांचा खंदा विश्वासू साथीदार म्हणजे डॉ. अमोल तेली.विरोधी पक्षाचा आमदार म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून द्यायचा लढा असेल अथवा कोव्हीड सारखी आपत्कालीन आणीबाणी असो…आमदार नितेश साहेबांनी ” अमोल आपणास हे काम करायचे आहे ” एवढं म्हटलं की अमोल कडून ते काम झालंच हा विश्वास खुद्द आमदार नितेश राणेंना आहे.आता सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील जनतेची भरभरून कामे करताना याच गोष्टीचा फायदा डॉ. अमोल तेली याना होतो. वैद्यकीय शिक्षण घेऊन सलग 8 वर्षे ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णसेवा केल्यानंतर डॉ अमोल तेली यांनी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश केला.फेब्रुवारी 2017 मध्ये राजकीय जीवनातील पहिली निवडणूक जिंकून डॉ अमोल तेली देवगड पं स चे सदस्य बनले.त्यानंतर देवगड पं स च्या उपसभापती पदीही त्यांनी यशस्वीपणे काम केले. वडील जनाशेठ तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आपला वडिलोपार्जित आंबा बागायतीचा व्यवसाय संभाळतानाच यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून देखील त्यांनी आपला जम बसवला आहे. आमदार नितेश राणे यांचा अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या डॉ. अमोल तेली यांचा आज वाढदिवस. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या डॉ.अमोल तेली याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
राणेंचा एकनिष्ठ शिलेदार – डॉ.अमोल तेली












