राजेंद्र परब शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत असले तरी समाजासाठी त्यांचे मार्गदर्शन सुरूच राहणार – सी. ए. हेमंत परब

काळसे हायस्कूलचे सहा. शिक्षक राजेंद्र परब यांचा सेवानिवृत्तीपर भव्य सत्कार संपन्न

चौके ( अमोल गोसावी ) :आमच्या श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे चे सहाय्यक शिक्षक राजेंद्र परब सर आज शासन नियमानुसार शाळेतून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत असले तरी ते आमच्यासाठी मात्र निवृत्त झालेले नाहीत कारण आमच्या संस्थेच्या उपक्रमात ते आम्हाला पूर्ण वेळ उपलब्ध होणार आहेत याचा आम्हाला आनंद आहे. आम्हाला काही काम करताना कधी कधी अशा काही अडचणी येतात, की त्या सुटण्याचे सर्व मार्ग बंद होतात असे वाटते तेव्हा आमच्या समोर एकच नाव येतं ते म्हणजे राजेंद्र परब , कारण यांना सांगितल की कोणतीही अडचण असो ती सोडवून काम पूर्ण करण्याची क्षमता राजेंद्र परब यांच्यामध्येच आहे असा माझा अनुभव आहे. नियमित हसरा चेहरा , उत्तम वक्तृत्व , प्रचंड क्रियाशिलता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतेही काम सांगितल तर सरांचा नकार कधीच नसतो या गुणांमुळेच परब सर मला जास्त प्रिय आहेत. असा हरहुन्नरी शिक्षक आमच्या शाळेला लाभला ही भाग्याची गोष्ट समजतो. राजेंद्र परब सर शिक्षक म्हणून निवृत्त होत असले तरी संस्थेसाठी , समाजासाठी , गावासाठी त्यांचे मार्गदर्शन सुरूच राहणार आहे. ” असे प्रतिपादन काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सी. ए. हेमंत परब यांनी काळसे हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षक राजेंद्र परब यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळ्यात बोलताना केले. काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे चे सहाय्यक शिक्षक श्री राजेंद्र परब यांचा संस्थेच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा काल शुक्रवार दि. ३० जून रोजी प्रशालेच्या कै. सौ. शैलजा महादेव केळुसकर सभागृहामध्ये संस्था अध्यक्ष सी. ए. हेमंत परब यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणचे निवृत्त प्राचार्य मेजर डॉ. श्रीपाद गिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सत्कारमुर्ती श्री राजेंद्र परब , सौ. समीक्षा परब , संस्था उपाध्यक्ष योगेश राऊळ , सहसचिव गजानन प्रभु , खजिनदार सिताराम परब , सदस्य शरद गोसावी , राजन प्रभु , मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर, लघुपाटबंधारे विभाग आंबडपाल चे कार्यकारी अभियंता श्रीमंगल , काळसे सरपंच विशाखा काळसेकर , उपसरपंच अनिल सरमळकर , माजी संस्था अध्यक्ष विजय वसंत प्रभु , अशोक प्रभु , सातेरी विकास सोसायटी अध्यक्ष परशुराम गुराम , डॉ. के. बी. पवार , रमेश मयेकर , अनंत परब , सिंधुदुर्ग बॅंक शाखाधिकारी रविंद्र शिवगण , पोलीस अधिकारी प्रमोद काळसेकर , संतोष वालावलकर, शिवनंदन प्रभु , तंटामुक्ती अध्यक्ष उमेश प्रभु , बाळकृष्ण काळसेकर , मधुकर घाडी रमेश जोशी , निवृत्त शिक्षक प्रकाश गोसावी , पोलीस पाटील विनायक प्रभु , शिक्षक भारती संघटनेचे सुरेश चौकेकर , कमलाकर आजगावकर , राजेंद्र परब यांचे कुटुंबीय कुमारी सिद्धी परब , श्रीमती ऊर्मिला परब , प्रविण परब , प्रशांत परब , सुभाष परब , उत्तम परब , गणेश परब , विजया परब , प्रभा पाडावे , नंदा परब , विदुला शिंदे, अपुर्वा परब , सायली परब , विणा परब आदी मान्यवर उपस्थित होते. काळसे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक तथा क्रिडाशिक्षक राजेंद्र परब हे काल २५ वर्षाच्या सेवेतून शासनाच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्याबद्दल राजेंद्र परब यांचा सपत्नीक संस्थेच्या वतीने अध्यक्ष सी. ए. हेमंत परब व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह , भेटवस्तू देवून भव्य सत्कार करण्यात आला. याबरोबरच श्री शिवाजी विद्यामंदिर शिक्षकवृंद , माजी विद्यार्थी सेवा संस्था , ग्रामपंचायत काळसे , श्री शिवाजी वाचन मंदिर , लघुपाटबंधारे विभाग , श्री. सातेरी वि. का. स. सेवा सोसायटी , बालसांस्कृतिक कला क्रिडा मंडळ काळसे धामापूर , सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक शाखा काळसे , संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ , शिक्षक भारती संघटना , आदी संस्थासह वैयक्तिक स्वरूपात डॉ. के. बी. पवार , अशोक प्रभु , शरद गोसावी , विनोद गोसावी , विजय वसंत प्रभु , रमेश मयेकर , प्रमोद काळसेकर , संतोष वालावलकर , मधुकर घाडी , प्रकाश गोसावी , आणि विद्यार्थ्यांनी राजेंद्र परब यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देउन सरांचा सत्कार केला आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थी , शिक्षक , माजी विद्यार्थी मुख्याध्यापक आणि उपस्थित मान्यवरांनी राजेंद्र परब यांच्या विषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्याविषयी आदरभावना आणि स्वतःला आले अनुभव व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे ॲड. सुहास सावंत यांनी असे सांगितले कि, ” या भागातील शेतीच अर्थकारण खऱ्या अर्थाने कोणी बदललं असेल तर ते परब सरांनी , या काळातही एवढ्या मोठ्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्याच कार्य राजेंद्र परब यांनी केलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे.” सत्कारानंतर बोलताना राजेंद्र परब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , आज शिक्षणक्षेत्रातून कायदेशीर रित्या निवृत्त होत असलो तरी पुढील आयुष्यातही शिक्षण घेत राहणार आहे आणि शिक्षण देत राहणार आहे. मी माझ्या सेवेतून मुक्त झालो तरी शाळेच काम सातत्याने करत राहणार आहे. याबरोबरच गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी काम करताना कुटुंबालाही जास्तीत जास्त वेळ देणार आहे. माझ्या शैक्षणिक कारकिर्दीत संस्थाचालक , सहकारी शिक्षक , मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ तसेच माझे कुटुंबीय यांचे बहुमोल सहकार्य लाभल्यामुळेच मी माझी २५ वर्षाची शैक्षणिक कारकिर्द यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. ” असे मत व्यक्त करत परब सर यांनी सत्कार करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर सर यांनी व सुत्रसंचालन माईणकर यांनी केले.

error: Content is protected !!