मोदींनी केंद्रात मंत्रीपद दिले तर कन्या खा. सुप्रिया सुळेही वडीलांची साथ सोडतील ; मोहन केळुसकर

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे आरपार बदलले आहेत. घराणेशाहीबाबत आवाज उठविणार्या शरद पवार यांनी खोरे आपल्याकडेच माती ओढते हे अलिकडेच दाखवून दिले आहे. पुतणे अजित पवार यांचे बंड पाहिले तर त्यांची सुकन्या खा. सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात मंत्रीपद दिले तर त्यांही राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकतील, अशी खोचक प्रतिक्रिया एकेकाळचे पवार यांचे सहकारी, समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते, कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

अजित पवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रयत शिक्षण संस्थेमध्ये केळुसकर हे विद्यमान अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत संस्थेचे कार्यकारिणीचे सदस्य म्हणून मांडीला मांडी लावून गेली अनेक वर्षें काम करीत आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हातिवले -राजापूरसह कोकणातील अनेक भागात या संस्थेची शाळा-महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे केळुसकर हे आजच्या बंडखोरीमुळे व्यथित झाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही खोचक टीका केली आहे.

राजकारण हे नितीभ्रष्ट झाले आहे. राजकारणात मतांची किंमत झिरो झाली आहे, असे सांगून ते म्हणाले, मतदारराजा हा सदविवेक बुध्दीला स्मरुन मतदान करीत असतो. पण गेल्या काही वर्षांतील अभद्र राजकारण पाहिल्यास मतदारांनाही मत का द्यावे, हा प्रश्न आता सतावत राहिला आहे.

error: Content is protected !!