गुरुलीलामृत पोथी परायणाची उद्या गुरुपौर्णिमेला होणार सांगता
देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी होणार असून त्यानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटे स्वामी मुर्तीवर अभिषेक, श्री ची पादुका पूजा, अभिषेक , श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने १ ते ३ जुलै या कालावधी आयोजित केलेल्या सामूहिक गुरुलीलामृत पोथी पारायण सांगता, नामस्मरण, महाआरती महाप्रसाद तसेच दुपारच्या देवगड तालुक्यातील दहावी परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिरगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजयकुमार कदम यांच्या हस्ते होणार आहे.सायंकाळी भवानी जंक्शन वारकरी भजन दिंडी दाभोळे राऊतवाडी यांचा दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ हडपीड मठाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.












