सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : माहेरी राहत असलेल्या पत्नीला कटर च्या सहाय्याने हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या गजानन गजानन चंद्रकांत शिरवंडेकर ( वय 38, रा शिवडाव, ता कणकवली ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश संजय भारुका यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी गजानन शिरवंडेकर याने 29 एप्रिल रोजी रात्री माहेरी हरकुळ येथे आपल्या वडिलांकडे राहत असलेली पत्नी दीपा हिच्यावर कटर ने जीवघेणा हल्ला केला. पत्नी दीपा हिने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गजानन वर आयपीसी 307, 323,504, 506 नुसार गुन्हा दाखल करून त्याला 30 एप्रिल रोजी अटक केली होती. 1 मे पासून आरोपी गजानन हा न्यायालयीन कोठडीत आहे. आज त्याच्या जामीन अर्जाला हरकत घेताना सरकारी वकील देसाई यांनी आरोपी गजानन हा गुन्हेगारी वृत्तीचा असून याधीही त्यांच्याविरोधात पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत, आरोपीने याधीही पत्नी दीपा ला मारहाण केल्याबद्दल त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे, आरोपी गजानन ने पत्नी दीपा ला ठार मारण्याची धमकी दिलेली आहे.गजानन हा अविचारी वृत्तीचा गुन्हेगार असून त्याच्याकडून खुनासारखा गंभीर गुन्हा होऊ शकतो, फिर्यादी तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो हे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.सरकारी वकील देसाईंचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी गजानन शिरवंडेकर चा जामीन नामंजूर केला.












