बांदा (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने बांदा येथे मोठी कारवाई करत अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणारी चारचाकी वाहनासह अंदाजे रु. ३८,८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ बांदा सर्व्हिस रोडवर, सलगर चहा दुकानासमोर बांदा येथे दि. २४/११/२०२६ रोजी रात्री २२:०० वाजताच्या सुमारास संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना गोव्यातून बांद्याच्या दिशेने येणारे टाटा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे इंट्रा चारचाकी वाहन क्र. MH-09-GJ-8235 ची तपासणी केली असता सदर वाहनाच्या मागील हौद्यामध्ये ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे एकूण २४० कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स (१०,०५० बाटल्या) इतका अवैध मद्यसाठा मिळून आला.
सदर प्रकरणी वाहन चालक प्रमोद अशोक निर्मळ, वय २७ वर्षे, रा. निर्मळ मळा, यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्यामध्ये अंदाजे रु. २८,८०,०००/- किंमतीचे मद्य व रु. १०,००,०००/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे रु. ३८,८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे , सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता, स्नेहलता नरवणे, विभागीय उपायुक्त, कोल्हापूर विभाग, किर्ती शेंडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाई धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, विवेक कदम, दुय्यम निरीक्षक, मिलिंद माळी, दुय्यम निरीक्षक,दिपक वायडंडे, जवान,संदीप कदम, जवान नि. वाहन चालक, सागर सूर्यवंशी, जवान,सतिश चौगुले, जवान व अभिषेक खत्री, जवान यांनी केली.
सदर प्रकरणी पुढील तपास धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली हे करीत आहे











