शिवसेना खारेपाटण – तळेरे विभागाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): शिवसेना शिंदे गट खारेपाटण – तळेरे विभाग व यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खारेपाटण – तळेरे विभगातील सर्व हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधून सन २०२२-२०२३ या शैशनिक वर्षी इयत्ता १०/१२ वी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम व करियर मार्गदर्शन समारंभ नुकताच खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परीसा रयबागकर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर, कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल हलगे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,सचिव – महेश कोळसुलकर, विधानसभा शेत्र संघटक संदेश पटेल, युवा सेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर,कणकवली तालुका प्रमुख शरद वायगणकर, उपतालुका प्रमुख मंगेश गुरव,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे,खारेपाटण हायस्कूलचे मुख्यद्यापक् श्री संजय सानप,खारेपाटण पोलीस दुरशेत्राचे प्रमुख श्री उद्धव साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.तर यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटण चे संचालक श्री मंगेश गुरव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.तर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अनिल हलगे यांचा शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी खारेपाटण -. तळेरे विभगातील इयत्ता १० वी /१२ वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. ” विद्यार्थ्याना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड मेहनत व अभ्यास करावा लागेल. शेत्र कोणतेही असो प्रामाणिक पणे काम केल्यास यश हमखास मिळते.” असे भावपूर्ण उदगार कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री अनिल हलगे यांनी यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना काढले. या कार्यक्रमाला खारेपाटण – तळेरे विभगातील शिवसैनिक पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!