सावधान ! सिंधुदुर्गात ६ जुलै रोजी ऑरेंज आणि 7 ते 9 जुलै यलो अलर्ट

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु असून हवामान खात्याने ६ जुलैला अति ते अतिमुसळधार ऑरेज अलर्ट आणि ७.८ व ९ जुलैला मुसळधार पावसाचा, यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. गरज नसताना घराच्या बाहेर कुणी पडू नये , समुद्री किनारी जाऊ नये असे आवाहन केले असून जिल्हा व तालुका स्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून आपत्कालीन मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी सपर्क करण्याचे आवाहनही केले आहे.

error: Content is protected !!