उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी सुळे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार

आमदार नितेश राणेंचा खबळजनक गौप्यस्फोट

मुंबईतील रोहीनगे , बांगलादेशी मुस्लिमांचा कर्ता धर्ता उद्धव ठाकरे

नितेश राणेंचा गंभीर आरोप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): उबाठा शिवसेना आणि सुळे गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसकडे देण्यात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणे यांनी गुरुवार 6 जुलै रोजी पत्रकार परिषदेत केला.काँग्रेस नेते पाटील यांच्याकडे उबाठा गटाकडून संजय राऊत आणि सुळे गटाकडून हा प्रस्ताव देण्यात आला असून पुढील निवडणूक एकाच चिन्हावर लढवण्याबाबत त्यांचा एकविचार झाला असल्याची माहिती मिळाल्याची आमदार नितेश राणे म्हणाले. अजित पवार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी पटना येथे मोदी विरोधी झालेल्या बैठकीचा बुरखा फाडला आहे. स्वतः शरद पवार म्हणतात की 2024 मध्ये मोदींचीच सत्ता येणार .मग संजय राजाराम राऊत कोणत्या तोंडाने तोंडाने महाराष्ट्रात महाविकास आघाडी च्या सत्तेचा आव आणत होते.मोदींविरोधी आणलेला आव किती भंपक होता हे अजित पवारांनी दाखवून दिले. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या राज्यातील महाविकास आघाडीचा बुरखा काल पुन्हा फाटला. आता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व असून 2024 मध्ये मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी चेच सरकार येणार आहे. संजय राऊत आणि त्याच्या मालकात हिम्मत असेल तर फ्रान्स मध्ये जिहादी लोकांच्या उच्छादाबद्दल सामनात लिहावे.जो त्रास आज फ्रांस आणि युरोप ला रोहिनगे आणि बांगलादेशी मुसलमानांचा होतोय, तोच त्रास उद्या मुंबईत देखील होईल. याबद्दल राऊत ने अग्रलेख लिहून दाखवावा. रोहिनगे आणि बांगलादेशी मुस्लिमांचा मुंबईतील कर्ता धरता उद्धव ठाकरे असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. मुंबईतील रोहिनगे आणि बांगलादेशी मुस्लिमाना मुंबईतून हाकलावे अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले.

error: Content is protected !!