नेरूर वालावल रस्त्यावर प्रवाहित वीज तार पडली रस्त्यावर ; सुदैवाने मनुष्यहानी टळली

कुडाळ (प्रतिनिधी): नेरूर वालावल रस्त्यावर आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल समोर मध्यरात्री विजेच्या तारा कोसळून पडल्या होत्या. प्रवाहित विज तारेचा स्पर्श होऊन त्यात दोन भटक्या कुत्र्यांचा जीव गेला आहे. मध्यरात्री लागलीच नेरूर चे वायरमन वैभव ठाकूर यांनी लाईन बंद केली. आणि पुढील अनर्थ टळला. त्यानंतर वैभव ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्युत तारा जोडत सकाळी लाईट पूर्ववत केली.

error: Content is protected !!