46 हजार 703 रुपये घाडीना केले सुपूर्त
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कुणकवण गांवातील रहिवाशी लक्ष्मण येसू घाडी उर्फ बाबा घाडी यांच्या राहत्या घराला आग लागली आणि लाखोंचे नुकसान झाले. ही बातमी समजताच कुणकवण गावातील मुंबईकर चाकरमान्यांनी बनवलेल्या व्हाटसप वाघ ग्रुपच्या माध्यमातून मुंबईस्थित सचिन राणे यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले.आणि बघता बघता आपल्या गाववाल्या ला मदत केली पाहिजे या भावनेतून कुणकवण वाघ ग्रुप च्या सदस्यांनी 46 हजार 703 रुपये स्वतःच्या खिशातून देत लक्ष्मण घाडी याना धीर दिला.
देवगड तालुक्यातील कुणकवण गांवातील बंदरवाडी येथील रहिवाशी श्री. लक्ष्मण येसू घाडी उर्फ बाबा घाडी यांच्या राहत्या घराला आग लागली व त्यांच्या घराचे प्रचंड नूकसान झाले होते. अशा वेळी गांवातील ग्रामस्थांनी त्यांना आधार देत आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे उपसरपंच गुरव,पोलीस पाटील छोटू रावराणे, आनंद ठाकूरदेसाई तसेच बंदरवाडीतील ग्रामस्थ यांनी यथाशक्ती मदत केली.
आनंद ठाकूरदेसाई, छोटू रावराणे यांच्या मार्फत मुंबई मधे वॉट्सअँप ग्रुप (कुणकवण वाघ ग्रुप) या नावाने कार्यरत आहे. या ग्रुपचे ऍडमीन सचिन शांताराम रावराणे यांना हि बातमी कळविण्यात आली. त्यांनी ताबडतोब वाघ ग्रुप च्या माध्यमातून मुंबई मधील चाकरमान्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आणि वाघ ग्रुप मधील सदस्यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत घोषित करण्यास सुरुवात केली आणि 46 हजार 703 रूपे एवढी रक्कम जमा करून श्री. लक्ष्मण येसू घाडी उर्फ बाबा घाडी यांना सुपूर्द केली. या दानशूर व्यक्तींनी माझ्या संकटाच्या वेळी आर्थिक मदत करून मला सहकार्य केल्याबद्दल श्री बाबा घाडी यांनी सर्वांचे आभार मानले तसेच मदत करण्याचे आवाहन मुंबईकर चाकरमान्यांना केले आणि स्वयंस्फूर्तीने ज्या दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली त्यांचे सचिन शांताराम राणे यांनी जाहीर आभार मानले आणि यापुढे कोणीही अडचणी/संकटात असेल तर आपण सर्वांनी असेच सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपावे आणि माणुसकी धर्म कायम रहाण्यासाठी कटिबद्ध राहूया अशी सर्वांनी प्रेमाची आणि आपुलकीची साद गांवकरी आणि मुंबईकर चाकरमान्यांना केली आहे.या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा वाढला असून संपूर्ण गांव हे एक कुटुंब आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाल्याचे सचिन राणे यांनी सांगितले आहे.












