आमदार नितेश राणेंचे आउट ऑफ बॉक्स काम

आमदार नितेश राणेंचे आउट ऑफ बॉक्स काम

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नॉन मेडिकल 12 स्टाफ 11 जुलै पासून सेवेत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 4 ज्युनिअर क्लार्क आणि 8 वॉर्डबॉय मी मुंबईतील एनजीओ शी बोलून उपलब्ध करून देत आहे.11 जुलै पासून 12 जणांचा स्टाफ रुग्णसेवेत हजर होईल अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 12 जणांच्या स्टाफ मुळे नॉन मेडिकल स्टाफ ची समस्या संपली असून त्याचा परिणाम रुग्णसेवा चांगली देण्यात होईल असे आमदार नितेश राणे म्हणाले.यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी उपस्थित होते. आमदार नितेश राणे म्हणाले की उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक साधनसामुग्री राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करून देणार आहे. 16 लाख रुपयांची सी आर्म मशीन जिल्हा नियोजन मधून देणार आहोत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सेवा का मिळत नाही ? याबाबत बैठक घेतली तेव्हा स्टाफ ची कमतरता असल्याचे जाणवले.त्यामुळे रुग्णसेवेत उणीव जाणवत होती. आरोग्य यंत्रणेकडे अपुरा स्टाफ ही सिंधुदुर्गातील अवस्था आहे.राज्य सरकार आमचे आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर सगळ्याच गोष्टी साध्य करता येतात.जनतेला सुविधा देण्यासाठी नकार देता नये हे केंद्रीयमंत्री राणेंचे संस्कार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण 13 जणांचा स्टाफ कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला अत्यावश्यक असल्याचे मला जाणवले होते.ही गरज पूर्ण करण्यासाठी मी मुंबईतील एनजीओ शी बोललो आहे.हा सर्व स्टाफ 11 जुलै पासून हजर होणार असून त्यांचा पगारही एनजीओ च्या द्वारे दिला जाणार आहे. शासनाकडून कर्मचारी भरती होण्याची वाट न बघता माझ्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा आधारवड असलेल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चांगली रुग्णसेवा देण्यासाठी मी बांधील आहे असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

error: Content is protected !!