आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रसाद मसुरकर इंस्पायर टीचर अवॉर्ड ने सन्मानित

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक तसेच हरकुळ बुद्रुक गावचे सुपुत्र प्रसाद नारायण मसुरकर यांचा आमदार वैभव नाईक साहेब यांच्या हस्ते “इंस्पायर टीचर अवॉर्ड २०२३” देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक प्रसाद मसुरकर यांनी २०१७ पासून राष्ट्रीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेला प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांना प्रविष्ट केले असून आतापर्यंत पाच विद्यार्थी राज्य पातळीवरील शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत तर ५० पेक्षा जास्त विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.

प्रशालेच्या या उज्जवल आणि सुवर्णमय यशाची दखल घेऊन संस्थेच्या ६९ व्या वर्धापन दिनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष पी डी सावंत, संचालक संदेश उर्फ गोट्या सावंत आणि पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर एच सावंत आणि पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी वर्ग, आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!