बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली या शाळेचा ‘क्षेत्रभेट’ उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी): अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या इयत्ता 1ली व 2 री च्या विद्यार्थ्यांनी भालचंद्र बाबा मठ कणकवली येथे भजन सादर केले . या प्रशालेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. असाच एक मंदिरास भेट देवून भजन सादर करण्याचा उपक्रम शाळेने आयोजित केला होता. यावेळी संगीत शिक्षक पाचंगे सर व तबला शिक्षक श्रीपाद बाणे सर, वर्गशिक्षिका नेहा जामसंडेकर व प्रेरणा चिंदरकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!