वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ले शहरातील डीलक्स सलून दुकानात अज्ञात चोरट्यांकडून चोरी झाली असून दुकानातील काचा सिलिंग यांची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे. दरम्यान वेंगुर्ले कॅम्प रस्त्यावरील श्री गावेश्वर मंदिर समोर हे शंकर पवार यांचे सलून आहे. अनेक वर्ष ते या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत. रविवारी मध्यरात्री कुणी अज्ञाताने दुकानासमोरील बाजूची तोडफोड केली. तसेच सगळ्या काचा फोडून सिलिंग चे हे नुकसान केले आहे त्याचबरोबर वरच्या छपरा वरील कवलेही फोडून टाकली आहे मठ येथील स्वयंभू मंदिरातील फंड पेटी चोरीचे प्रकरण ताजे असतानाच आता वेंगुर्ले शहरात हात चोरीचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी योग्य ती माहिती घेऊन या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चोरी करून सलून मध्ये तोडफोड











