सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून मुकुंद चिलवंत यांनी स्विकारला कार्यभार!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी पदाच्या कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची रत्नागिरी येथे प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची शासनाने नियुक्ती केली आहे. बुधवारी चिलवंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!