यशाचा पाठलाग करा: सूर्यकांत पालव यांचे आवाहन

बिळवस येथे गुणवंतांचा गुणगौरव

मसुरे (प्रतिनिधी) : अभ्यास करताना सातत्य ठेवा. प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. यश मिळविणे सोपे असले तरी ते टिकविणे तितकेच कठीण आहे. जीवनात नेहमी मोठी स्वप्ने बघा आणि जागे पणी स्वप्नांचा पाठलाग करा असे आवाहन बिळवस ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांनी येथे केले.

बिळवस ग्रामसेवा मंडळाच्या वतीने दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम माध्यमिक विद्यालय बिळवस येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इयत्ता १२ वी मध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.सेवानिवृत्त झालेले सहाय्यक शिक्षक रमेश सिताराम नाईक यांचा सत्कार करण्यात आला.मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी बिळवस ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष सुर्यकांत जगन्नाथ पालव,सरपंच मानसी लक्ष्मण पालव, संस्था कार्याध्यक्ष दाजी विश्राम पालव, शाळा समिती उपाध्यक्ष व माजी पोलीस पाटील गोविंद सोम सावंत, संस्था सरचिटणीस अशोक जनार्दन पालव, खजिनदार प्रभाकर रघुनाथ पालव, माजी सभापती सुधीर साळसकर, माजी खजिनदार विवेक कृष्णा पालव,उप खजिनदार विश्वनाथ दिगंबर पालव, सह चिटणीस भास्कर वसंत पालव,अभिमन्यू अर्जुन पालव, सुभाष जनार्दन पालव,एकनाथ बाबाजी पालव,सुधीर सोम सावंत,

अशोक रामचंद्र पालव,सुर्यकांत रघुपती पालव, रमेश घनश्याम पालव, सोनू विश्राम शिंदे,सुधीर विश्वनाथ परब, प्रकाश फणसे,सतिश सोम सावंत,सुधीर रामचंद्र साळसकर,संतोष परब आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री ठाकूर यांनी केले.

error: Content is protected !!