मारहाण करणाऱ्या युवकाला खाकी ने दिला प्रसाद
अंडरपास मध्ये उभ्या राहणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची पालकांतून मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील एका मोठ्या शाळेतील विद्यार्थ्याला एका युवकाकडून शाळेसमोरील अंडरपास मध्ये मारहाणी ची घटना 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. त्या शाळेच्या सकाळ च्या सत्रातील वर्ग सुटण्याच्या आणि दुपार च्या सत्रातील वर्ग भरण्याच्या वेळी शाळेसमोरील अंडरपास मध्ये रोडरोमिओंच्या वाहनांची गर्दी झालेली असते.या रोडरोमिओकडून शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थीनीना धोका पोचू शकतो.त्याचीच प्रचिती आज सकाळी शाळेतील एका विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीतून आली.या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. विद्यार्थ्याला मारहाण होत असल्याचे समजताच शाळेतील काही शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेत मारहाणीतून त्या विद्यार्थ्याची सुटका केली. मारहाण करणाऱ्या युवकाला शाळेत मुख्याध्यापक कार्यालयात आणण्यात आले.कणकवली पोलीस ठाण्यातील पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्या युवकाला पोलीस ठाण्यात नेले .दरम्यान काही शिक्षकांनी तसेच पोलिसांनी ही मारहाण करणाऱ्या त्या युवकाला प्रसाद दिला.मात्र या घटनेबाबत कायदेशीर कारवाई झाली अथवा नाही याबाबत माहिती मिळाली नाही.











