देवगड पोलिसांकडून शिरगाव येथे मटका बुकीवर छापा

देवगड (प्रतिनिधी): देवगड पोलिसांनी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेत मुंबई मटका घेताना दीपक सुनील गोडे ( वय 25, रा.चंदन हॉटेलसमोर,धोपटेवाडी शिरगाव ) याच्यावर 19 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी कारवाई केली.त्याच्याकडून रोख रु 660 व मटक्याचे पावती पुस्तक व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आप्पा आचरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक गोडे वर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!